Search This Blog

Wednesday, 14 March 2018

‘बीबीसी’च्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये मिताली राजभारतीय महिला कसोटी व वन-डे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला देदीप्यमान कारकिर्दीत आणखी एक बहुमान लाभला आहे. ‘बीबीसी’ने गेल्या वर्षातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये मितालीची निवड केली आहे.
या यादीत विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या महिलांचा समावेश आहे. आत दिल्लीच्या योगशिक्षीका इरा त्रिवेदी, तिहार तुरुंगातील मुलांना शिक्षण देणार्या तुलिका किरण, बंगळूरच्या आदिती अवस्थी, अभिनेते नवाझुद्दीन सिद्दिकी यांच्या आई मेहरुन्निसा यांचाही समावेश आहे.
‘बीबीसी’ने म्हटले आहे की, आधुनिक युगात खेळापासून उद्योगापर्यंत विविध कलात्मक क्षेत्रांत महिला प्रतिभेचा जागतिक पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटला आहे. या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही ही यादी तयार केली आहे. जगभरातून निवडलेल्या महिलांमध्ये भारतीय महिलांचाही समावेश आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात अथक कार्य करीत प्रेरणास्थान म्हणून लौकिक मिळविला आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी