Search This Blog

Wednesday, 14 March 2018

मोदी-मॅक्रॉन यांचे 'वाराणसी दर्शन'फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'वाराणसी दर्शन' केले आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला. या दोन्ही नेत्यांनी बोटीतून प्रवास करत वाराणसीमधील विविध नदीघाटही पाहिले. 

वाराणसीत आल्यावर मॅक्रॉन यांनी सर्वप्रथम येथील प्रसिद्ध हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांचे शहनाई वाजवून स्वागत झाले. मॅक्रॉन यांना वाराणसीमधील हस्तकलेच्या परंपरेची माहिती देण्यात आली. त्यांना कलाकारांनी हस्तकलेच्या वस्तूही करून दाखविल्या. त्यांना हातमागावर प्रसिद्ध बनारसी साडीही विणून दाखविण्यात आली. ही कला पाहून मॅक्रॉन प्रभावित झाले
यानंतर त्यांनी 'रामचरितमानस'वर आधारित 'चित्रकूट' हे नाटक पाहिले. या नाटकामध्ये भगवान श्रीरामाच्या वनवासातील जीवनाचे चित्रण केले आहे. 
आणि मॅक्रॉन हे अस्सी घाटावर पोचताच त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी फुलांनी सजविलेल्या बोटीतून विविध घाटांचे दर्शन घेतले. या वीस मिनिटांच्या फेरीत त्यांनी तुलसी घाटावर रामलीला, प्रभू घाटावर भगवान बुद्धांनी दिलेल्या पहिले प्रवचन, निरंजनी घाटावर नागासाधूंचा 'भस्मी शृंगार', मानससरोवर घाटावर संत कबीरांचे दोहे आणि चौसत्ती घाटावर कथक नृत्य आणि पारंपरिक वाद्यवादन अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी