Search This Blog

Wednesday, 14 March 2018

ग्लोबल करप्शन इंडेक्स 2017ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्थेने 2017 चा ग्लोबल करप्शन इंडेक्स जाहीर केला असून भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत 81 व्या स्थानी असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 2015 मध्ये या यादीत भारत 79 व्या स्थानी होता. त्यात किंचित सुधारणा झाली
1995 पासून ग्लोबल करप्शन इंडेक्स तयार केला जात आहे. यात एकूण 180 देशांतील सरकारच्या विविध विभागांमधील भ्रष्टाचाराची सद्यस्थिती जाणून घेतली जाते. कोणत्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती आहे, याचा नेमका वेध घेण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला जातो. विश्लेषक, उद्योजक आणि तज्ज्ञांच्या मतांचा कानोसा घेतला जातो. यात उपलब्ध माहितीच्या आधारे 0 ते 100 पर्यंत गुण दिले जातात. सर्वात कमी गुण ज्या देशाला असतील त्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार, असे या इंडेक्सचे सूत्र आहे.
भ्रष्टाचाराच्या या इंडेक्समध्ये भारताला 40 गुण देण्यात आले असून यादीत भारत 81 व्या स्थानी आहे. 2015 मध्ये भारताला 38 गुण देण्यात आले होते. त्यावेळी भारत या यादीत 79 व्या स्थानी होता.
न्यूझीलंड हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश ठरला आहे. न्यूझीलंडला 89 गुण मिळाले आहेत. त्यानंतर 88 गुणांसह डेन्मार्क दुसर्या स्थानी आहे. भारत आणि चीनची तुलना केल्यास चीनमध्ये भारतापेक्षा कमी भ्रष्टाचार आढळून आला आहे. या यादीत चीन 77 व्या स्थानी आहे. पाकिस्तानला 32 गुण देण्यात आले असून या यादीत पाक 117 व्या स्थानी आहे. सोमालिया हा देश सर्वाधिक भ्रष्टाचारी देश ठरला आहे. सोमालियाला केवळ 9 गुण देण्यात आले आहेत. त्यानंतर सुदान आणि सीरिया दुसर्या आणि तिसर्या स्थानी आहेत.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी