महाराष्ट्र राज्याची निर्मिती
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
भौगोलिक स्थान
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.प्रशासन
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २०११)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असून पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उप-मुख्यमंत्री आहेत.
विभाग


महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
1. पुणे विभाग
- क्षेत्रफळ - ५८,२६८ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ९९,७३,७६१
- जिल्हे - कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा
- साक्षरता - ७६.९५%
- ओलिताखालील जमीन : ८,८९६ किमी²
- मुख्य पिके - ज्वारी, गहू, बाजरी, ऊस, तांदूळ, सोयबीन, कांदा, भुईमुग, द्राक्ष
- क्षेत्रफळ - ६४,८११ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५५,८९,२२३
- जिल्हे - औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा
- साक्षरता - ६८.९५%
- ओलिताखालील जमीन : ९,६११ किमी²
Nice Questions and Answer, thank u for this site
ReplyDeletegood site
Delete
ReplyDeletepractice
Practice
ReplyDeleteAUR THODE MAP RAHTE TO BOHAT ACCHE SE GEOGRAPHY SUBJECT SABKO SAMAJTA SIR
ReplyDeletePls add more contents....
ReplyDeleteIt is very less
very useful information
ReplyDeleteThankssss....Here For Very Important Information
ReplyDeleteYa
ReplyDeleteI requested please add in this math & iq
ReplyDeletenice...but more detai about maharashtra geography.....thanks
ReplyDeletesir apan ajun pan bharpur kahi deu shakata
ReplyDeleteksa aahe aapla maharashtra
ReplyDeletegood for student success
ReplyDeleteSIR KHUP CHAN BAR AJUN THODI MAHITICHI BHAR TAKA SIR TAHANKING YOU SIR
ReplyDeletegeography subjectcha anakhi notes miltil ka?
ReplyDeleteSir, Maharashtra cha Geography Madhe Ajun Information Asne Garjeche Ahe Sir ( Industries,Local Profession,Culture, Population)
ReplyDeleteplease update information.....
ReplyDeletePlease update information..............
ReplyDeletenice site
ReplyDeletenice site
ReplyDeletenice site
ReplyDelete